नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारपासून नाशिकमध्ये असून त्यांच्या उपस्थितीत दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज त्यांच्या हस्ते डॅा. अनिरुध्द धर्माधिकारी यांच्या श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटच्या नव्या हॅास्पिटलचे उदघाटन दुपारी १२.१५ वाजता होणार आहे. त्यानंतर ते १.१५ वाजता ओझर विमानतळावरुन मुंबईला रवाना होणार आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये दुपारी २.३० वाजता मुंबईवरुन विमानाने येणार आहे. विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला ते दुपारी ३ वाजता हजेरी लावणार आहे. त्यानंतर ४ वाजता ते मुंबईकडे विमानाने रवाना होणार आहे.

