मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाहनांच्या ताफ्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याला दंड सुनावण्यात आला आहे. वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी येथील वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या सहाय्यक फौजदाराला १०० रुपयांचा दंड सुनावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाचा ताफा सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास वर्षा निवासस्थानावरुन विधान भवनाकडे निघाला होता. या रस्त्यावरुन जात असताना एअर इंडियापासून पुढे साखर भवनापर्यंत त्यांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले. या प्रकरणामुळे एका सहाय्यक पौलिस फौजदाराला वाहतुकीचे नियमन, नियंत्रण, कर्तव्यामध्ये हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत हा दंड सुनावण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर कोणतीही समस्या येऊ नये म्हणून २२ ऑगस्ट रोजी हा रस्ता काही काळ बंद ठेवण्यात आला होता. विधिमंडळाच्या संकुल वाहतूक विभागाच्या एका पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलिस फौजदाराची २२ वाहतूक पोलिसांनी विधान भवन, मरीन ड्राइव्ह वाहतूक मंत्रालय, मंत्र्यांच्या शासकीय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या गैंडा निवासस्थानांच्या मार्गावर संबंधित फौजदाराची नेमणूक करण्यात आली होती.
CM Convoy Stuck in Traffic Police Fine
Mumbai Eknath Shinde