नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपचे नेते तथा खासदार संजय सिंह यांना अहमदाबादच्या एका न्यायालयाने समन्स बजावले आहे. एका मानहानीच्या प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले आहे. गुजरात विद्यापीठाचे कुलसचिव पीयूष पटेल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयपीसीच्या कलम ५०० अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्याची दखल घेत न्यायालयाने हे समन्स काढले आहे.
अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत आणि ट्विटर हँडलवर विद्यापीठाविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. यामुळे प्रतिष्ठित संस्थेची प्रतिमा खराब झाली आहे. ज्यावर अहमदाबाद न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी जयेशभाई चौवटिया यांनी शनिवारी केजरीवाल आणि संजय सिंह यांना समन्स बजावले आहे. २३ मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे या समन्सद्वारे बजावण्यात आले आहे.
गुजरात विद्यापीठ म्हणते
गुजरात विद्यापीठाने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, केजरीवाल आणि संजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींच्या पदवीच्या मुद्द्यावरून विद्यापीठाविरोधात अपमानास्पद विधाने केली आहेत. तक्रारदाराच्या वकिलांनी सांगितले की, ‘गुजरात विद्यापीठाची स्थापना ७० वर्षांपूर्वी झाली असून जनतेमध्ये त्यांची प्रतिष्ठा आहे. या आरोपांमुळे जनतेमध्ये विद्यापीठाची विश्वासार्हता ढासळली आहे.
काय म्हणाले होते केजरीवाल
केजरीवाल म्हणाले होते की ‘जर पदवी आहे आणि ती बरोबर आहे तर ती का दिली जाऊ शकत नाही?’ ‘पदवी बनावट असल्यामुळेच ती दिली जात नाही’. पंतप्रधानांनी दिल्ली विद्यापीठ आणि गुजरात विद्यापीठात शिक्षण घेतले असेल, तर गुजरात विद्यापीठाने आपला विद्यार्थी देशाचा पंतप्रधान झाल्याचा आनंद साजरा करायला हवा.
काय म्हणाले होते संजय सिंह
संजय सिंह म्हणाले की, ‘तो पंतप्रधानांची बनावट पदवी खरी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. न्यायालयाच्या चौकशीदरम्यान चार साक्षीदारही हजर करण्यात आले. गुजरात विद्यापीठाच्या वकिलांनी सांगितले की, या विधानांमुळे विद्यापीठ बनावट पदव्या जारी करत असल्याचा संदेश गेला आहे.
CM Arvind Kejriwal MP Sanjay Singh Court Summons