इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून त्यामुळे राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी राज ठाकरे यांची भेट घेतली. तर आता ठाकरे गटाचे तीन मोठे नेते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेले आहे. हे तीनही नेते उध्दव ठाकरे यांच्या जवळचे असल्यामुळे राजकारणात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहे. गेल्या महिन्यापासून उध्दव ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळीक वाढत असल्याचे दिसत होते.
आजच्या या भेटीत ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री सुभाष देसाई व अंबादास दानवे हे मुख्यमंत्र्याच्या सागर बंगल्यावर गेले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाच्या अनुषंगाने ही बैठक असल्याचे बोलले जाते. पण, हे तीनही नेते गेल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुका संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधात ठाकरेच्या शिवसेना गटाने फारशी आक्रमक भूमिका घेतली नाही. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसात तर सामनामधून फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थही काढला जात आहे.