नाशिक – कोरोनाच्या परिस्थितीमध्ये नाशिकमध्ये उत्तम काम झाल्याचे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रशासनाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी मी मोकळ्या वातावरणात पहिल्यांदा बोलतोय व पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात मी मास्क काढला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमी मध्ये नवनिर्मित इनडोअर फायरिंग रेंज, सिंथेटीक ट्रॅक, अॅस्ट्रो टर्फ फुटबॉल मैदान, अॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदान, सिंथेटीक टॉपिंग हॉलिबॉल, बास्केटबॉल मैदान तसेच निसर्ग नावाचे नूतन नैसर्गिक जलशुद्धीकरण प्रकल्प यांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थितीत होते.