सोमवार, सप्टेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली ताराक्कासह ११ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली…

by Gautam Sancheti
जानेवारी 2, 2025 | 1:28 am
in इतर
0
WhatsApp Image 2025 01 01 at 50231 PM 900x420 1 e1735761509487

गडचिरोली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नववर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीसाठी विकासाची नवीन पहाट घेवून आला असून विकासाच्या, सामाजिक सलोख्याच्या, शांततेच्या आणि औद्योगीकरणाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल सुरू राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

नवीन वर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात व्यतित केला. त्यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली ताराक्कासह ११ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी बससेवेचा त्यांनी शुभारंभ केला आणि त्या बसमधून प्रवासही केला. लॉईड्सच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यातून ६ हजार २०० कोटींची गुंतवणूक होत असून, चार हजारावर रोजगारनिर्मिती होत आहे.

आज सकाळी गडचिरोली जिल्ह्यात आगमन झाल्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे थेट ताडगुडा ब्रीज येथे गेले. गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग तसेच ताडगुडा पुलाचे त्यांनी लोकार्पण केले. पेनगुंडा येथे त्यांनी जवानांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. हा परिसर अतिदुर्गम व नक्षलप्रभावीत मानला जातो. थेट मुख्यमंत्र्यांनी त्याठिकाणी जाऊन एक वेगळा संदेश दिला. या भागात जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत.

त्यानंतर दुपारी कोनसरी येथे, लॉईड्सच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यात कोनसरी येथे डीआयआय प्लांट (400 कोटी रुपये गुंतवणूक, 700 रोजगार), पेलेट प्लांट आणि स्लरी पाईपलाईन (3000 कोटी रुपये गुंतवणूक, 1000 रोजगार), हेडरी, एटापल्ली येथे आयर्न ओअर ग्राईडिंग प्लांट (2 हजार 700 कोटी रुपये गुंतवणूक, 1 हजार 500 रोजगार), वन्या गारमेंट युनिट (20 कोटी रुपये गुंतवणूक, 600 रोजगार) याचा समावेश आहे. शिवाय लॉईडस काली अम्मल हॉस्पीटल आणि लॉईडस राज विद्यानिकेतन सीबीएसई शाळेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केला. सुमारे 1 हजार 200 विद्यार्थ्यांना येथे शिक्षण मिळणार आहे. पोलिसांसाठी निवासस्थाने, जिमखाना, बालोद्यान इत्यादींचेही लोकार्पण करण्यात आले. कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे 1000 कोटींचे समभाग प्रदान करुन एकप्रकारे मालकी देण्याचाही स्तुत्य उपक्रम लॉईड्सने हाती घेतला. हे समभाग मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

गडचिरोलीत ग्रीन माईनिंगचाही शुभारंभ करण्यात आला. यातून खाणींचे संरक्षण होणार असून लोहखनिजासाठी स्लरी पाईपलाईनमुळे इंधन बचत होणार, कार्बन उर्त्सजन कमी होणार, रस्त्यावरील अपघातही कमी होणार आहेत. ग्रीन माईनिंगचा प्रयोग देशातून गडचिरोलीत प्रथमच राबविण्यात येत आहे. गोंडवाना विद्यापीठ ऑस्ट्रेलियन विद्यापीठाशी एक करार करणार असून, त्यातून मायनिंगशी संबंधित सर्व अभ्यासक्रम सुरु करण्यात येतील. यातून गडचिरोलीतील तरुणांना रोजगार मिळणार आहे, अशीही माहिती, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

११ जहाल नक्षलींचे समर्पण
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत आज 11 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात 8 महिला आणि 3 पुरुष यांचा समावेश आहे. यात दोन दाम्पत्य आहेत. या 11 जणांवर महाराष्ट्रात 1 कोटींपेक्षा अधिकचे बक्षीस होते. छत्तीसगड सरकारने सुद्धा त्यांच्यावर बक्षिस जाहीर केले होते. यात दंडकारण्य झोनल कमिटीच्या प्रमुख आणि भूपतीची पत्नी ताराक्का आहेत. 34 वर्षांपासून त्या नक्षली चळवळीत आहेत. 3 डिव्हिजन किमिटी मेंबर तर 1 उपकमांडर, 2 एरिया कमिटी मेंबर आहेत. या सर्वांना पुढचे जीवन जगण्यासाठी 86 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. निवडणूक आचारसंहितेच्या काळात 5 नक्षली ठार झाले. 2024 या वर्षांत 24 नक्षली ठार झाले आणि 18 माओवाद्यांना अटक करण्यात आली. गेल्या 6 महिन्यात 16 जहाल नक्षलवादी आणि आज 11 असे 27 जण मुख्य प्रवाहात आले आहेत. पोलीस दलाच्या प्रयत्नामुळे सातत्याने माओवादींचे आत्मसमर्पण सुरू असून यामुळे माओवादाची कंबर तोडण्याचं काम होत असल्याचे ते म्हणाले.

उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली, लवकरच दक्षिण गडचिरोली सुद्धा होईल. गेल्या 4 वर्षांत एकही युवक किंवा युवती माओवादात सहभागी झाली नाही, ही फार मोठी उपलब्धी आहे. 11 गावांनी नक्षलवाद्यांना बंदी केली आहे. सी-60 च्या जवानांनी जनतेचा विश्वास संपादन केला. आता संविधानविरोधी चळवळीत कुणीही जायला तयार नाही, ही आनंदाची बाब आहे. न्याय मिळायचा असेल तर भारतीय संविधानानेच मिळू शकतो, तो माओवादी विचारसरणीने मिळू शकत नाही, हे जनतेला आता पटले आहे. येत्या काळात गडचिरोलीला पोलाद सिटीचा दर्जा मिळणार, असे श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पोलीस दलाला ५ बस, १४ चारचाकी, ३० मोटारसायकलीचे ‍लोकार्पण करण्यात आले. तसेच येथील पोलीस दलाच्या नूतन हेलिकॉप्टर हॅंगर चे उद्घाटनही करण्यात आले. तसेच विविध नक्षल चकमकीमध्ये शौर्य दाखविणाऱ्या सी-60 च्या पोलीस जवानांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आ. डॉ. मिलिंद नरोटे, पद्मश्री पूर्णामासी जानी, पद्मश्री परशुराम खूणे, लॉईड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले हे निर्देश

Next Post

या व्यक्तींनी आर्थिक प्रलोभनांपासून दूर रहावे…जाणून घ्या, गुरुवार, २ जानेवारीचे राशिभविष्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

SEX RACKET
संमिश्र वार्ता

गर्ल्स हॅास्टेलमध्ये सेक्स रॅकेट….१० तरुणींसह ११ जण ताब्यात

सप्टेंबर 8, 2025
bhujbal 11
महत्त्वाच्या बातम्या

मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात मंत्री छगन भुजबळ उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

सप्टेंबर 8, 2025
Untitled 2
महत्त्वाच्या बातम्या

उल्हासनगरमध्ये कलानींचा तब्बल १५ नगरसेवकांसह शिवसेनेला पाठिंबा…भाजपला धक्का

सप्टेंबर 8, 2025
G0NrBxTWkAALc8P e1757300035808
संमिश्र वार्ता

कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या, हे जाहीर करा…रोहित पवार यांचा सवाल

सप्टेंबर 8, 2025
rain1
संमिश्र वार्ता

आजपासून पुढील पाच दिवस पावसाची उघडीप…त्यानंतर या तारखेपासून पुन्हा पाऊस

सप्टेंबर 8, 2025
541656183 1104530571863252 1386343450728100575 n
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये १६ तास चालली विसर्जन मिरवणूक….२ लाख २६ हजार १७७ मूर्तीचे संकलन

सप्टेंबर 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, जाणून घ्या, सोमवार, ८ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
doctor
संमिश्र वार्ता

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

सप्टेंबर 7, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक प्रलोभनांपासून दूर रहावे…जाणून घ्या, गुरुवार, २ जानेवारीचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011