गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

by India Darpan
डिसेंबर 20, 2024 | 5:27 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Capture 4

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची अस्मिता आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केले.

कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी विधानपरिषद सदस्य ॲड. अनिल परब यांनी मांडलेल्या विधानपरिषद नियम 289 अन्वये चर्चेला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उत्तर दिले. या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री ॲड. परब, शशिकांत शिंदे, अरुण उर्फ भाई जगताप, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कल्याण येथील एका सोसायटीत अखिलेश शुक्ला व त्याच्या पत्नीने भांडणात मराठी माणसाचा अवमान केला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शुक्ला हा ‘एमटीडीसी’चा कर्मचारी असून त्याला निलंबित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

महाराष्ट्र, मुंबई ही मराठी माणसाची अस्मिता आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे देशभरातील विविध समाज, समुदाय येत असतात आणि ते येथे शांततेने राहतात. उत्तर प्रदेशातून आलेले अनेक लोक मराठी भाषा उत्तम बोलतात, अनेक मराठी सण साजरे करतात. मात्र, अशा काही लोकांमुळे या सामाजिक सलोख्याला गालबोट लागते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, एखाद्याचा आहार कोणत्या पद्धतीचा, प्रकारचा असावा याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशा प्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. या आधारावर भेदभाव मान्य नाही. अशा तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

देशातील वैविध्य टिकले पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. क्षेत्रिय अस्मिता म्हणजेच मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यावर घाला घातल्यास सहन करणार नाही, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दैनिक देशदूतचे संस्थापक देवकिसनजी सारडा यांचे निधन

Next Post

सह्याद्री फार्म्सची घौडदौड: उभारली रू.३९० कोटींची नवीन गुंतवणूक

Next Post
IMG 20241220 WA0309 1

सह्याद्री फार्म्सची घौडदौड: उभारली रू.३९० कोटींची नवीन गुंतवणूक

ताज्या बातम्या

Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
crime1

वाहन पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकावर टोळक्याने केला हल्ला…गोदाघाटावरील घटना

जून 19, 2025
image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011