इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी सांगितले की, आपण मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो तेव्हा पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींची भेट घ्यायची असते असा संकेत आहे. आज सकाळी पंतप्रधान मोदा यांच्यासमवेत दीर्घ भेट झाली. मी त्यांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्र संदर्भात चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. येथील अर्थव्यस्थेला कृतीची जोड देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रासाठी मी पूर्ण सहकार्य द्यायला तयार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
या भेटीनंतर फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले की, आपला अमूल्य वेळ, मार्गदर्शन, आशीर्वाद आणि महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार. गेल्या १० वर्षात तुमच्या पाठिंब्याने महाराष्ट्र जवळपास प्रत्येक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे आणि आता तुमच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली विकासाचा हा प्रवास पुढील स्तरावर नेण्याचे ध्येय आहे. तुम्ही आमच्या सारख्या करोडो भाजप कार्यकर्त्यांना आणखी कठोर परिश्रम करण्यासाठी नेहमीच प्रेरणा देत आहात असे म्हटले आहे.
मंत्रिमंडळाबाबत काय म्हणाले
महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अजित पवार हे त्यांच्या कामासाठी दिल्लीत आले आहेत. तर मी माझ्या कामासाठी. आमच्या दोघांची कालपासून भेट झालेली नाही. एकनाथ शिंदे यांचे दिल्लीत कोणतेही काम नव्हते. त्यामुळे ते दिल्लीत आले नाही. महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळासंदर्भात कोणताही तिढा नाही. मी काल रात्री अमित शाह, बी. एन. संतोष आणि जे.पी. नड्डा यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी द्यायची याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतील. भाजपकडून मंत्रिपदासाठी प्रत्येक खात्यासाठी कोणात मंत्री असू शकतो यासाठी काही नावं निवडण्यात आली आहेत. आता भाजपचे वरिष्ठ नेते त्याबाबत अंतिम निर्णय घेतील. असे त्यांनी संगितले.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1867095660014485706