बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध

by India Darpan
डिसेंबर 10, 2024 | 1:06 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Screenshot 2024 12 09 183352

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कर्नाटक सरकारकडून बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिक जनतेवर सुरु असलेल्या अन्यायाचा आम्ही निषेध करतो. मराठी माणसांनी मेळावे घेऊ नयेत, अशी कर्नाटक सरकारने घेतलेली भूमिका घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे. तसेच कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्नाटक विधानसभेतील प्रतिमा काढणार असल्याचे वक्तव्य केले, हे गंभीर असून या घटनेचा राज्य शासन निषेध करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्र विधानमंडळ सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र होत नाही तोवर आमचा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यातील १२ कोटी जनता आणि जगभरातील मराठी माणूस कर्नाटक सीमाभागातील मराठी माणसाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी आम्ही शिक्षण, आरोग्य सेवा उपलब्ध केल्या आहेत. यापुढे देखील सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे सरकार तत्पर राहील.

मराठी भाषिकांना विरोध करणारी कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारने विरोध केला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य यांना अटक करण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधींना स्थानबद्ध करण्यात आले. या कर्नाटक सरकारच्या कृत्याचा महाराष्ट्र शासन तीव्र निषेध करीत आहे. मी देखील मराठी भाषिकांच्या लढ्यात तुरुंगवास भोगला असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती तीच भूमिका आमच्या सरकारची आहे. सर्वोच्च न्यायालयात शासनाच्या वतीने वकील दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देखील यापूर्वी या प्रश्नाबाबत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन देखील कर्नाटक सरकार अशी भूमिका घेत असेल तर कर्नाटक सरकारच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत बोलताना स्पष्ट केले. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबर रोजी नागपूरला

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला एलआयसीच्या बिमा सखी योजनेचा शुभारंभ….

Next Post
GeWUHPaXIAAIjWq e1733767852121

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला एलआयसीच्या बिमा सखी योजनेचा शुभारंभ....

ताज्या बातम्या

01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011