मुंबई – पंढरपूरला महापुजेसाठी सोमवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जात असतांना कुरकंब गावाजवळ दोन बाईक स्वारांचा भीषण अपघात झाला. हे कळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या ताफ्यातील रुगणवाहिका त्यांच्या मदतीसाठी देण्याचे आदेश दिले. त्यानंतर पंढरपूरला गेल्यानंतर या दोन तरुणांच्या प्रकृतीची चौकशीसुध्दा त्यांनी केली. या घटनेचे ट्विट शिवसेना नेत्या डॅा. नीलम गो-हे यांनी करत संवेदनशील व जनतेची काळजी असणारे कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या संवेदनशीलतेमुळे या दोन्ही तरुणांचे प्राण वाचले.
https://twitter.com/neelamgorhe/status/1417158658773774336?s=20