मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान याबाबत सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांना दिले.
महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘एनडीआरएफ’मधून भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. पूरग्रस्तांना ‘एनडीआरएफ’मधून मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारला सविस्तर प्रस्ताव लवकरच पाठवणार आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवेदनात म्हटले आहे.