इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. यावेळी फडणवीस म्हणाले लोकांना सर्वप्रकारची मदत सरकार करणार आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत करताना राज्य सरकार कुठेही हात आखडता घेणार नाही…
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे राज्यातील बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी आज मुख्यमंत्री यांनी केली. माढा नंतर ते लातूर जिल्हयातील औसा तालुक्यात पोहचले. यावेळी शेतक-यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकरी कर्जमाफी करण्याची मागणी केली.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व निकष बाजूला ठेऊन आम्ही सर्व सरसकट मदत करणार आहोत. टंचाई म्हणजे दुष्काळ, टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना केल्या जातात. तशाप्रकारच्या सगळ्या उपाययोजना आम्ही लागू करणार आहोत. सर्वांना मदत दिली जाणार आहे. ज्यांच्या घरामधअये पाणी शिरलं आहे. ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालं आहे. त्यांनाही मदत केली जाणार आहे. आम्ही कोणालाही वा-यावर सोडणार नाही.