इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर मधील शिवर्तीर्थ निवासस्थानी उध्दव ठाकरे हे आज सहकुटुंब गणपती दर्शनासाठी गेले. त्यानतंर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. आज सकाळीच त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ते घरच्या गणपतीची स्थापना झाल्यानंतर ते राज ठाकरे यांच्या घरी गेले. राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. त्यामुळे आजच प्रमुख नेते हजेरी लावण्याची शक्यता आहे.
सकाळी उध्दव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्यात बंद दरवाजाआड दहा मिनीट चर्चा झाली. त्यामुळे ती चर्चा नेमकी काय झाली यावर वेगवेगळे तर्क लावण्यात येत आहे.
उध्दव ठाकरे यांची तिसरी भेट
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्री या निवासस्थानी गेले होते. यावेळी त्यांनी शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले. मातोश्रीवर पोहोचल्यावर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी बाळासाहेब बसायचे त्या विशेष खुर्चीला वंदन करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर आता उध्दव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी जाणार असल्याचे बोलले जात होते. ते आज गेले. काही दिवसांपूर्वी ठाकरे बंधू मराठी मुद्द्यावर एकत्र आले. त्यानंतर हे दोन्ही बंधू उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आले. त्यानंतर ही तिसरी भेट आहे.