इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर वर्षा या शासकीय निवासस्थानी गृहप्रवेश केला. यावेळी त्यांनी कन्या दिविजा फडणवीस १० वीच्या परीक्षेत ९२.६० टक्के गुणांसह उत्तीर्ण झाल्याची माहिती दिली. आजच्या शुभ मुहूर्तावर या दोन घटना फडणीस यांच्या कुटुंबियासाठी आनंदाच्या ठरल्या.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही १०वी च्या बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.