मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जनतेच्या अर्जांवरील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली…

by India Darpan
एप्रिल 20, 2025 | 7:38 pm
in मुख्य बातमी
0
पीजीआरएस प्रणाली 1 1024x681 1

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज व निवेदनांवर सकारात्मक कार्यवाही होवून या अर्जाची सद्यस्थिती अर्जदाराला एसएमएसद्वारे कळण्यासाठी पब्लिक ग्रिव्हेन्सेस रिडर्रसल सिस्टिम (पीजीआरएस) ही ऑनलाईन प्रणाली लवकरच कार्यान्वित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुख्यमंत्री सचिवालयात या संदर्भात बैठक झाली.

शासकीय कामकाजामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला तात्काळ दिलासा देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. यास अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्यावेळी व येथील मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांशी व विषयांशी संबंधित निवेदने, अर्ज व तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवून त्यावर उचित कार्यवाही होण्याच्या दृष्टीने पीजीआरएस ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष कार्यधिकारी आशा पठाण यांनी या ऑनलाईन प्रणाली विषयी सविस्तर सादरीकरण केले.

या ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त निवेदने व अर्जांचे विभागनिहाय व तक्रारनिहाय वर्गीकरण करण्यात येईल. हे अर्ज व निवेदने स्कॅन करून संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल व त्याची माहिती एसएमएसद्वारे अर्जदाराला कळेल. संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येवून अर्जदाराचा अर्ज निकाली काढल्याबाबत अर्जदारास एसएमएसद्वारे माहिती मिळेल. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या ऑनलाईन प्रणालीबाबत समाधान व्यक्त केले. लवकरच ही सुविधा जनेतेचा सेवेत रूजू होणार आहे.

बैठकीस विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, भूमि अभिलेख, समाज कल्याण आदी विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला जनता दरबार…२ हजार नागरीक सहभागी, ६२६ निवेदन प्राप्त

Next Post

आतापर्यंतचे सर्वोच्च महिला प्रतिनिधित्व…आयएएस अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या १८० जणांच्या तुकडीमध्ये ७४ महिला अधिकारी

Next Post
image001RBHX

आतापर्यंतचे सर्वोच्च महिला प्रतिनिधित्व…आयएएस अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या १८० जणांच्या तुकडीमध्ये ७४ महिला अधिकारी

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी 2 1024x682 1

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण….

जून 3, 2025
Hon CM Japan Deligation Meeting 4 1024x406 1

तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र

जून 3, 2025
Untitled 6

धक्कादायक…एनसीईआरटीच्या २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती…

जून 3, 2025
GscFSVjaQAAtzfC

आयपीएल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट…पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॅाफी?

जून 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधी, जाणून घ्या, बुधवार, ३ जूनचे राशिभविष्य

जून 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011