मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्ह वरुन संवाद साधला. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटर आदींची कमतरता जाणवत आहे. राज्यात येत्या १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांचा राज्यातील जनतेशी संवाद, महत्त्वाचे मुद्दे
-
संयुक्त महाराष्ट्रातील बलिदान देणा-यांना अभिवादन
-
कामगारांनाही शुभेच्छा आणि अभिवादन
-
संयुक्त महाराष्ट्रात गिरणी कामगारांचे मोठे योगदान
-
राज्यातील रुग्णवाढ थांबवली
-
यापेक्षा कडक निर्बंध घालण्याची वेळ येणार नाही
-
गेल्या काही दिवसात रुग्णवाढ स्थिरावली
-
रोजी मंदावेल , पण रोटी थांबू देणार नाही
-
राज्यात हित साधलं जात असेल तर इतरांचं अनुकरण करु
-
गेल्या वर्षी २ प्रयोगशाळा सध्या ६०९ प्रयोगशाळा
-
राज्यात साडेपाच हजार कोविड सेंटर्स
-
२८ हजार ९३७ आयसीयू बेडस
-
रेमडेसिवीर इंजेक्शनची ५० हजाराची राज्याला गरज
-
रेमडेसिवीर ४३ हजाराची मागणी केंद्राने मान्य केली
-
आता रेमडेसिवीर ३५ हजार मिळत आहे
-
रेमडेसिवीर अनावश्यक वापर टाळा,
-
राज्यात ऑक्सिजनचा काटकसरीने वापर
-
हॅास्पिटलमध्येच ऑक्सिजन प्लांटची व्यवस्था करणार
-
तिसरी लाट आली तरी ऑक्सिजनची कमतरता पडू देणार नाही
-
काही ठिकाणी ऑक्सिजन प्लांटची काम सुरु
-
ऑक्सिजन प्लांटच्या शेजारीच कोविड सेंटर
-
गेल्या वर्षभरात आरोग्य यंत्रणेने उसंत घेतली नाही
-
नाशिक, विरार सारख्या घटना दुर्दैवी, आरोग्य कर्मचारी हताश झाले
-
जम्बो कोविड सेंटरर्सेच फायर अॉडीट,
-
पुढचे दोन महिने शिवभोजन थाळी मोफत
-
९ लाख कामगारांच्या खात्यात पैसे जमा
-
तिसरी लाट येणार असं तज्ञाचं म्हणणं
-
तिस-या लाटेला थोपवल्याशिवाय राहणार नाही, तोंड देण्यासाठी सरकारची तयारी
-
आतापर्यंत १ कोटी ५८ लाख नागरिकांचे लसीकरण
-
कोरोना चाचणीबाबत महाराष्ट्राचा पहिला नंबर
-
१८ ते ४४ वयेगटातले ६ कोटी नागरिक
-
१२ कोटी डोस द्यावे लागणार, एकरक्कमी खरेदी करण्याची तयारी
-
मे महिन्यात १८ लाख डोस मिळणार
-
आता ३ लाख डोस शिल्लक
-
आता आपल्याला थांबता येणार नाही
-
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरण उद्यापासून सुरुवात
-
जशजशी लस उपलब्द होईल तसे लसीकरण
-
रोज १० लाख लसीकरण करण्याची राज्याची क्षमता
-
प्रत्येक राज्यातील लसीकरणाचे वेगळे अॅप करा असे केंद्राला विनंती
-
जून – जुलैपर्यंत लशीचा पुरवठा सुरळीत होईल
-
लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका
-
जे सहकार्य आजपर्यंत केले, ते पुढेही अपेक्षित
-
येत्या महिन्यात लग्नसमारंभ जास्त, २५ जणांची मर्यादा पाळा, संयम ठेवा
-
महाराष्ट्र लवकरच संकटावर मात करेल