माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
मकर संक्रांत झाल्यानंतर थंडीचा जोर कमी होतो. आता संक्रांत होऊन जवळपास २० दिवस झालेत. त्यामुळे थंडी गायब होणार का, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या आठवड्यात हवामान नक्की कसे असेल, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. पावसाची शक्यता आहे का, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. तर, चला जाणून घेऊ या आठवड्यातील हवामानाचा अंदाज…
सध्या सरासरी इतकाही झटक्याखाली वारा वहनचा अभाव आहे. सध्या सरासरी इतकेच किंवा अर्ध्या एक डिग्रीने मुंबईसह महाराष्ट्रातील पहाटेचे किमान तापमान खालावले आहे. त्यामुळे सदर दिवसात शरीराला झोंबणारा विशेष गारवा (कि ज्याला ग्रामीण भागात ‘कळंघण किंवा वरळ म्हणतात) जाणवत नाही. अर्थात पूर्व विदर्भात मात्र गारव्याचे प्रमाण अधिक आहेच.
दुपारच्या कमाल तापमानताही सरासरीपेक्षा एक दोन डिग्रीने असलेल्या वाढीमुळे महाराष्ट्रात उबदारपणा जाणवत आहे. सदर कार्यरत असलेले सध्या महाराष्ट्रातील असे तापमान आणि त्याच्या जोडीला निरभ्र आकाश असे वातावरण पुढील ५ दिवस म्हणजे रविवार दि.१२ फेब्रुवारीपर्यन्त राहण्याची शक्यता जाणवते. यामुळे मानवी जीवनासहित रब्बी पिके व फळबागांना सदरचे तापमान अधिक लाभदायी होत नसले तरी घातक परिणाम करणारे नाही, हीच जमेची बाजू समजू या.
ही वातावरणीय सद्य स्थिती असली तरी एकंदरीत थंडीचा प्रभाव कमी होतोय, असे समजू नये. अजूनही कमी अधिक थंडीची आवर्तने ही जाणवणारच आहेत. तसेच सध्या आपण गारपिटीच्या कालखंडातून जात आहोत व महाराष्ट्रात तरी सध्या कोठेही गारपिटीची शक्यता सध्या तरी जाणवत नाही. ही सुद्धा अजून एक जमेची बाजू शेतकऱ्यांनी समजावी असे वाटते.
सध्या दोन पश्चिमी झंजावात काश्मीरसह संपूर्ण वायव्य भारतात कार्यरत आहेत. म्हणूनच अती नसली तरी काहीशी थंडी सध्या महाराष्ट्रात जाणवत आहे. उत्तर भारतातील पश्चिमी झंजावाताच्या साखळ्यांना खंड नाही.
सध्या इतकेच!
वातारणात बदल झाल्यास तसा अंदाज देण्यात येईल
Climate Weather Forecast Winter Summer by Manikrao Khule