पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शरद पवार यांचा पंतप्रधान होण्याचा दोन वेळा चान्स हुकला. त्यांनी आता निवृत्त व्हायला पाहिजे. त्यांचे वय झाले आहे. त्यांनी आराम करायला हवा असे मोठे वक्तव्य सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (सीआयआय) मालक सायरस पुनावाला यांनी केले. पुण्यात कोरगाव येथील एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले.
विशेष म्हणजे पुनावाला हे शरद पवार यांचे वर्गमित्र आहे. त्यांच्याकडून हे वक्तव्य आल्यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी शरद पवार यांचे पुतणे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा पवारसाहेबांचे वय झाले आता त्यांनी थांबावे असे वक्तव्य केले होते. पण, त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागला.
राजीनामा मागे घेतला होता
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांनंतर कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर पवारांनी निर्णय बदलला. पण, आता हे मोठे वक्तव्य वर्ग मित्रांकडून समोर आल्यामुळे पुन्हा एकदा पवारांच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरु झाली आहे.
इंडिया आघाडीची बैठकीपूर्वीच वक्तव्य
विशेष म्हणजे इंडिया आघाडीची दोन दिवस मुंबईत बैठक आहे. या बैठकीला देशभरातून विरोधी पक्षाचे नेते एकत्र येत आहे. त्यात शरद पवार यांची प्रमुख भूमिका असतांना त्यांच्या वर्गमित्राकडूनचे हे मोठे वक्तव्य आल्यामुळे त्याला शरद पवार कसे उत्तर देतात हे महत्त्वाचे आहे.
Classmate Cyrus Poonawala on Sharad Pawar Retirement
Pune Politics NCP