हैदराबाद (आंध्र प्रदेश) – एखादा व्यक्ती कितीही उच्च पदावर पोहचला तरीही त्याला आपल्या मूळ गावाविषयी आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा असतो. त्यामुळे ‘गड्या आपला गाव बरा!’ असे म्हणत तो कधीतरी आपल्या गावाला पोहोचतो, तेव्हा त्यांचे जंगी स्वागत होते.
भारतीय संस्कृतीत तर खेडेगाव आला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. महात्मा गांधी यांनी देखील ‘खेड्याकडे चला I ‘ असा मंत्र दिला होता. आजच्या काळात शहर आणि ग्रामीण गाव यात फारसा फरक राहिला नाही, तरी ‘ आणि खेडे हे ग्लोबल व्हिलेज बनले तरी गावाविषयी अद्यापही शहरातील लोकांना एक वेगळेच आकर्षण असते. अशाच एका सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या व्यक्तीचे त्यांच्या मूळ गावात अत्यंत जंगी स्वागत झाले आणि मिरवणूकही काढण्यात आली.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमना यांनी शुक्रवारी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पोन्नावरम या त्यांच्या मूळ गावी पोहोचले. गावातील लोकांनीही त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. विशेष म्हणजे सरन्यायाधीशांना विविध फुलांनी सजवलेल्या बैलगाडीतून गावात फिरवण्यात आले. तसेच यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होत राहिला.
सरन्यायाधीशांसह त्यांची पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनीही बैलगाडीवर बसून संपूर्ण गावाचा दौरा केला. यावेळी ग्रामस्थ त्यांच्यासोबत पायी चालत राहिले. ग्रामस्थांच्या स्वागताने रामनाही भावूक झाले. देशाचे सरन्यायाधीश झाल्यानंतर रमण हे पहिल्यांदाच आपल्या गावी आले आहेत.
https://twitter.com/xpressandhra/status/1474278190323355648?s=20
न्यायमूर्ती रमण यांनी गावकऱ्यांशी तेलुगूमध्ये संवाद साधला. यावेळी स्वागताबद्दल सर्वांचे आभार मानून ते म्हणाले की, देश प्रगती करत आहे, मात्र अनेक समस्या अजूनही कायम आहेत. यावेळी त्यांनी सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन केले. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा म्हणाले की, त्यांना त्यांची मातृभाषा तेलुगू आणि त्यांची जन्मभूमी आवडते. सरन्यायाधीशांची ही साधी जीवन शैली पाहून गावातील लोकही भारावून गेले.
दरम्यान, सरन्यायाधीश एनव्ही रमणा भावूक झाले. यावेळी आपल्या बालपणीच्या दिवसांची आठवण करून देताना ते म्हणाले की, त्यांचे वडील कम्युनिस्ट पक्षाचे समर्थक होते. त्यामुळेच त्यांना स्वतंत्र पक्षाची विचारधारा आवडली. ते म्हणाले, ‘जात, पात, धर्माचा विचार न करता सर्वांनी एकत्र राहावे, अशी माझी नेहमीच इच्छा आहे.’ न्यायमूर्ती रमण राज्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून त्यादरम्यान ते अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.