नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून आजपर्यंत सरकार असो, वकील असो किंवा देशातील मोठे उद्योगपती असो कुणाचीही पर्वा केली नाही. ज्याठिकाणी जो चुकला असेल त्याला वेळीच फटकारले आहे. आता आणखी एका कारणाने सरन्यायाधीशांनी वकिलांना फटकारले आहे. आणि त्याची चांगलीच चर्चा होत आहे.
सरन्यायाधिशांनी वकिलांना फटकारण्याची ही पहिला वेळ नाही. अगदी काहीच दिवसांपूर्वी एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. यात त्याने सर्वोच्च न्यायालयात खटल्यांची यादी योग्य प्रकारे केली जात नाही. त्यामुळे महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य मिळत नाही, अशी कैफियत मांडली होती. सोबतच सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांची यादी अॉनलाईन पद्धतीने व्हावी व तातडीचा विचार करून व्हावी, अशी मागणी त्याने याचिकेमार्फत केली होती. त्यावेळी त्याला सरन्यायाधीशांनी चांगलेच खडसावले होते. आत्ता या क्षणी मी १४० प्रकरणांवर सुनावणी घेतोय, असे सांगून त्याला खडे बोल सुनावले होते.
हे प्रकरण ताजे असतानाच सरन्यायाधीशांनी महिलांसोबतच्या वागणुकीवरून वकिलांना फटकारले. महिलांचा सन्मान करायला शिका, असे त्यांनी स्पष्ट शब्दात वकिलांना सांगितले. यापूर्वीही त्यांनी वकिलांच्या न्यायालयातील गैरवर्तनाची दखल घेऊन वकिलांना समज दिली होती. पण यावेळी प्रत्यक्ष सरन्यायाधीशांपुढे एक सुनावणी सुरू असतानाच गैरप्रकार घडला आणि त्यामुळे त्यांनी वेळीच संबंधित वकिलाला समज दिली. सोबतच एकूणच वकील वर्गाला महिलांचा सन्मान करण्यासंदर्भात सुनावले.
‘घरी असेच वागता का?’
माईक घेण्यासाठी तुम्ही महिलेच्या खांद्यावर हात ठेवत आहात? तुम्ही तुमच्या घरी आणि घराबाहेरही असेच वागता का? तुमच्या समोर एक महिला आहे, तिचा आदर सन्मान करणे शिका, या शब्दात सरन्यायाधीशांनी वकिलाला सुनावले.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1659485297216978945?s=20
CJI Chandrachud on Lawyer angry lady