नाशिक – २१ वर्षीय मुलाच्या घश्यात अडकलेले १० रुपयांचे नाणे यशस्वी शस्त्रक्रिया करुन जिल्हा रुग्णालय येथे सकाळी ११ वाजता काढण्यात आले. नरेश नारायण सुपे हे तरुणाचे नाव आहे. मोखाडा एसटी बस मध्ये वाहकांकडे तिकीट पैसे देत असतांना त्याच्या तोंडात १० रुपयांचे नाणे अडकले. त्यामुळे त्यास गिळायला व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोखाडा येथे नेण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले. येथे कान नाक घसा तज्ज्ञ डॉ संजय गांगुर्डे व डॉ उन्मेष वरवंडकर यांनी त्वरित तपासणी केली. त्यानंतर एक्स रे व उपचार चालू करून सकाळी ऑपरेशन थिएटरे येथे दुर्बिणीतून पूर्ण भुल देऊन शाश्त्रकिया करण्यात आली. त्यात अन्न नलिका व श्वास नलिकाच्या मध्ये अडककले दहा रुपयांचे नाणे यशस्वीपणे काढण्यात आले. जिल्हा रुगालय येथील भूल तज्ज्ञ डॉ सचिन पवार त्यांचे सहकारी व ओटी स्टाफ सिस्टर श्रीमती कडवे, परदेशी, बर्वे यांनी यावेळेस सहकार्य केले. रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्यचिकीत्सक डॅा अशोक थोरात व अति.जिल्हाशल्य चिकीत्सक डॅा. श्रीवास यांचे आभार व्यक्त केले.