नाशिक – रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी कर्मयोगीनगर, गोविंदनगर भागात रात्रीची घंटागाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशन केली आहे. याबाबत नाशिक महापालिकेचे प्रशासक रमेश पवार यांना २५ मार्च २०२२ रोजी निवेदन देण्यात आले आहे. कर्मयोगीनगर, तिडकेनगर, उंटवाडी, जगतापनगर, सिटी सेंटर मॉल ते गोविंदनगर यासह विविध ठिकाणी कचर्याचे ढीग साचलेले आढळतात. महापालिकेने वेळोवेळी कचरा उचलूनही या ठिकाणी वारंवार कचरा टाकला जातो. नोकरी, व्यवसायासाठी घरातून सकाळी लवकर बाहेर पडणार्या रहिवाशांना सकाळी नऊनंतर आणि दुपारी येणार्या घंटागाडीत कचरा टाकणे शक्य होत नाही. या भागात रात्रीची घंटागाडी सुरू केल्यास रस्त्यावर कचरा टाकणे कमी होईल. शून्य कचरा संकल्पनेला मदत होईल. खोडे मळा, सद्गुरूनगर, कालिका पार्क, जगतापनगर, प्रियंका पार्क, गोविंदनगर, कर्मयोगीनगर या भागातील रहिवाशांना याचा फायदा होईल. दिवसाची घंटागाडी नियमित सुरू ठेवावी, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, संजय टकले, धवलताई खैरनार, संगिता देशमुख, सुजाता काळे, मिनाक्षी पाटील, संध्या बोराडे, ज्योत्स्ना पाटील, शीतल गवळी, श्रीकांत नाईक, दिलीप दिवाणे, विनोद पोळ, मनोज वाणी, बाळासाहेब राऊतराय, राहुल पाटील, हरिष काळे, वंदना पाटील, मीना टकले, प्रतिभा पाटील, उज्ज्वला सोनजे, सुनीता उबाळे, संगिता चोपडे, माया पुजारी, संगिता नाफडे, मनोज पाटील, नीलेश ठाकूर, दीपक दुट्टे, अशोक पाटील, मकरंद पुरेकर, आशुतोष तिडके, नितीन तिडके, बन्सीलाल पाटील, शैलेश महाजन, संदीप महाजन, पुरुषोत्तम शिरोडे, संकेत गायकवाड (देशमुख), प्रथमेश पाटील आदींसह रहिवाशांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
लवकरच निर्णय घेणार – डॉ. पलोड
या निवेदनाची दखल घेऊन येत्या काही दिवसात रात्रीची घंटागाडी सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे महापालिका घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले.