नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वे किंवा बसमध्ये जागा किंवा सीटवर बसण्यावरून प्रवाशांमध्ये अनेक वेळा भांडण होते. परंतु काही वेळा हा वाद इतका विकोपाला जातो की, हे भांडण कोणीही सोडवू शकत नाही. दिल्ली शहरात देखील दिल्ली परिवहन कार्पोरेशनच्या ( डीटीसी ) बसमध्ये असाच प्रकार घडला. दोन महिलांचे जागेवरून भांडण सुरू होते.
विशेष म्हणजे लेडीज सीटवर एक पुरुष बसला होता. त्यामुळे दुसरी महिला त्या पुरुषाला उठण्यास सांगत होती. तर पुरुषासोबत असलेली महिला तिला या बाबतीत विरोध करत होती. त्यामुळे हे भांडण चांगलेच विकोपाला गेले. विशेष म्हणजे आजूबाजूच्या प्रवाशांचे चांगले मनोरंजन झाले. विशेष म्हणजे एक प्रवाशांने याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. आता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
खरे म्हणजे सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत असून दिल्लीतील डीटीसी बसमध्ये दोन महिला सीटसाठी भांडताना दिसत आहेत. या महिलांची जोरदार भांडण पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. तर काही नेटकरी या भांडणाची मजा घेताना दिसत आहेत.
सदर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर सुमिती चौधरी नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून तो खूप पाहिला व शेअर केला जात आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत १ लाख वेळा पाहिला गेला असून १० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. ३ मिनिटे ५९ सेकंदांच्या या व्हिडिओवर आतापर्यंत ३ हजारांहून अधिक लोकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. कारण त्या महिला एकमेकांना शिव्या देताना बुक्के व ठोसे मारताना दिसत आहेत.
व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ मी दिल्लीच्या बसमध्ये २ महिलांना भांडताना पाहिले, त्या दोन्ही सीटसाठी लढत होत्या, हा फ्री तिकिटाचा परिणाम आहे. तुम्ही व्हिडिओ बघा आणि काही चूक असेल तर सांगा!’ एका यूजरने लिहिले की, ‘येथे लोकांना फ्री तिकीट आणि सीटही हवी आहेत.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘येथे सर्व दोष त्या पुरुषाचा आहे जो लेडीज सीटवर बसला आहे.’
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हिडीओत ती महिला पुरुषाला म्हणते ‘ तुम्ही उठला नाहीत तर मी तुमची कॉलर पकडून तुम्हाला उठवेन हे चांगले दिसेल का?’ असे म्हणत त्या माणसाच्या शर्टला हात लावत असल्याचे दिसत आहे. अखेर त्या व्यक्तीला आपली जागा सोडावी लागली त्यानंतर हा वाद मिटला.
https://www.facebook.com/watch/?v=1403102980438014
City Bus Women’s Fight on Seat Sharing Video Viral