मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय कार बाजारामध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक आणि दणकट कार लॉन्च होत आहेत त्यातच सिट्रोन सी3 लाँच करण्यात आली आहे. या कारसाठी कंपनीची सुरुवातीची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 5.70 लाख रुपये आहे. या कंपनीची भारतातील ही दुसरी कार आहे. तसेच कंपनीने 1 जुलैपासून प्री-बुकिंग सुरू केली आहे.
विशेष म्हणजे ही कार एसयूव्ही एक बी-सेगमेंट हॅचबॅक आहे. नवीन C3 ची डिलिव्हरी सुरू झाली असून ग्राहक कंपनीच्या शोरूमला भेट देऊन कार बुक करू शकतात. तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे कंपनी देशातील 90 शहरांमध्ये कारची विक्री करणार असून त्या माध्यमातून ग्राहकांशी सरळ संपर्क साधून कारची विक्री केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या कारची ग्राहकांना प्रतीक्षा होती, कंपनीकडून कारच्या फीचर्स व किंमतीची माहिती देण्यात आली नव्हती, परंतु साधारणत: या सेगमेंटमधील इतर कारच्या किंमती ऐवढीच किंमत कंपनीकडून ठेवण्यात येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता.
भारतीय बाजारपेठेत Citroen C3 ही कार दोन इंजिनसोबत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये 1198 cc 3 सिलेंडर प्युरेटेक 82 एस्पिरेटेड आणि 1199 cc 3 सिलेंडर प्युरेटेक 110 टर्बो इंजिनचा समावेश करण्यात आला आहे. कारचे Puretech 82 नॅचरली एस्पिरेटेड इंजिन 5750 आरपीएमवर 82 पीएसची कमाल पॉवर आणि 3750 आरपीएमवर 115 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. त्याच वेळी, Puretech 110 टर्बो इंजिन 5500 आरपीएमवर 110 पीएसची कमाल पॉवर आणि 1750 आरपीएमवर 190 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच कारचे Puretech 82 एस्पिरेटेड इंजिन 19.8 kmpl चा मायलेज देते. तर दुसरीकडे Puretech 110 टर्बो इंजिन 19.4 kmpl चा मायलेज देते.
कारची किंमत अशी :
1.2 पेट्रोल लाईव्ह – 5.70 लाख.
1.2 पेट्रोल – 6.62 लाख.
1.2 पेट्रोल फील वाइब पॅक – 6.77 लाख.
1.2 पेट्रोल फील ड्युअल टोन: 6.77 लाख.
1.2 पेट्रोल ड्युअल वाइब पॅक : 6.92 लाख
1.2 टर्बो फील ड्युअल टोन वाइब पॅक – 8.05 लाख.
Citroen C3 Car Launch in India Price Features and Details