इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने मार्ग क्रमांक २३१ नाशिकरोड ते गिरणारे हा नवीन बस मार्ग सुरु करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जे.आय.टी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवाश्यांची महाविद्यालय मार्गावर बसफेरी सुरु करण्याची मागणी होत होती. त्यानुसार संपूर्ण सर्वेक्षण करण्यात आले आणि अखेर सोमवार ४ ऑगस्ट २०२५ रोजी पासून सदर मार्गावर बसफेरी सुरु करण्यात आली आहे. जास्तीत जास्त प्रवाश्यांनी या बससेवेचा लाभ घेण्याच आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.