इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि अर्थातच सिटीलिंकच्या वतीने नाशिक शहर व शहर हद्दीपासून २० किमी पर्यंत विविध मार्गांवर बससेवा पुरविण्यात येत आहे. यातच आता सिटीलिंकच्या वतीने आणखी दोन मार्गांवर बससेवा सुरु करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रवाश्यांची होत असलेली मागणी लक्षात घेता मार्ग क्रमांक १०२ एम – निमाणी ते बारदान फाटा व मार्ग क्रमांक १७१ – चुंचाळे गाव ते बारदान फाटा अशा दोन मार्गांवर ही बससेवा सुरु करण्यात आली आहे. यातील मार्ग क्रमांक १०२ एम ही बस महिंद्रा अॅण्ड महिंद्रा येथे कार्यरत कर्मचाऱ्यांकरिता तर मार्ग क्रमांक १७१ ही बस चुंचाळे येथे राहणार्या विद्यार्थी व कामगारांना सातपूर येथील शाळा व एमआयडीसी येथे जाण्याकरता प्रवास सोयीचा व्हावा याकरिता हे सुरू करण्यात आली आहे. या दोनही मार्गांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे –
१)मार्ग क्रमांक १०२ एम – निमाणी ते बारदानफाटा मार्गे सिव्हील, सातपूर, महिंद्रा गेट.
बसेसची वेळ –
निमाणी ते बारदान फाटा- ८:२०, ९:२०, १०:४०, ११:४०, १४:१०, १४:२०, १६:२०, १७:००; १९:२०.
बारदान फाटा ते निमाणी – ७:१०, ८:१०, ९:२५, १०:३५, ११:५०, १२:५०, १५:४५, १७:२०, १८:१०.
तपोवन ते बारदान फाटा – ६:००, ७:००.
बारदान फाटा ते तपोवन – १७:२०, २०:४०.
२)मार्ग क्रमांक १७१ – चुंचाळे गाव ते बारदान फाटा मार्गे एकस्लो, सातपूर, श्रमिकनगर.
बसेसची वेळ –
तपोवन ते चुंचाळे – ०५:०५.
चुंचाळे ते बारदान फाटा – ०७:००, ०८:३०, १४:००, १६:१५, १७:४५.
बारदान फाटा ते चुंचाळे – ०७:४५, १३:१५, १५:३०, १७:००, १८:४०.
बारदान फाटा ते निमाणी – ०९:१५.
चुंचाळे ते तपोवन – १९:२५.
वरील दोनही मार्गांवरील बससेवा आज २५ ऑगस्ट २०२५ रोजी पासून सुरु झाली आहे. तरी जास्तीत जास्त प्रवाश्यांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. च्या वतीने करण्यात आले आहे.