इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. च्या वतीने नाशिक शहरातील तसेच महानगरपालिका हद्दीपासून २० किमी पर्यंत च्या विविध मार्गांवर बससेवा पुरविण्यात येते. तर दररोज हजारो नाशिककर या बससेवेचा लाभ घेतात. गेल्या काही दिवसांपासून प्रवाश्यांची असलेली मागणी लक्षात घेता सिटीलिंकच्या वतीने दिनांक ८ जानेवारी पासून निमाणी ते निमाणी मार्गे के.टी.एच.एम व निमाणी ते निमाणी मार्गे सिम्बोयसीस अशी दोन मार्गे चक्री बससेवा सुरु करण्यात आली आहे. बुधवार दिनांक ८ जानेवारी २०२५ पासून सुरु करण्यात आलेल्या चक्रीबस सेवेचा जास्तीत जास्त प्रवाश्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाने केले आहे.
चक्री बससेवेचा तपशील पुढीलप्रमाणे-
१) मार्ग क्रमांक ४०१ ए –
मार्ग – निमाणी ते निमाणी मार्गे सीबीएस, त्रिमूर्ती, सिम्बोयसीस, अंबडगाव, एक्स्लो, पपया नर्सरी, सातपूर, बारदान फाटा, केटीएचएम, रविवार कारंजा.
वेळा – ०७:०५, ०८:०५, ०९:०५, १०:०५, ११:०५, १२:०५, १३:३५, १४:३५, १५:३५, १६:३५, १७:३५,१८:३५
२) मार्ग क्रमांक ४०१ बी –
मार्ग – निमाणी ते निमाणी मार्गे सीबीएस, केटीएचएम, बारदान फाटा, सातपूर, अंबड लिंकरोड, एक्स्लो, अंबड गाव, सिम्बोयसीस, त्रिमूर्ती, सिव्हील हॉस्पिटल, रविवार कारंजा.
वेळा – ०७:००, ०८:००, ०९:००, १०:००, ११:००, १२:००, १३:३०, १४:३०, १५:३०, १६:३०, १७:३०, १८:३०