नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक) च्या वतीने नवीन दोन मार्गांवर बससेवा सुरु करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रवाश्यांकडून होणारी मागणी लक्षात घेता सिटीलिंकच्या वतीने मार्ग क्रमांक २०४ नाशिकरोड ते पाथर्डी गाव मार्गे द्वारका, महामार्ग, इंदिरानगर व मार्ग क्रमांक २०६ नाशिकरोड ते अमृतानगर मार्गे द्वारका, महामार्ग, पाथर्डीफाटा अश्या दोन मार्गांवर बससेवा सुरु करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या दोनही मार्गांवर पंचवटी एक्प्रेस कनेक्टेड बसेस देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
सदर दोनही मार्ग व बसेसच्या वेळा पुढीलप्रमाणे-
१) मार्ग क्रमांक २०४ – नाशिकरोड ते पाथर्डी गाव मार्गे द्वारका, महामार्ग, इंदिरानगर.
वेळा – नाशिकरोड ते पाथर्डी गाव -६:३०, ७:००, ७:३०, ८:००, ८:३०, ९:००, ९:३०, १०:००, १०:३०, ११:००, ११:३०, १२:००, १२:३०, १३:००, १४:००, १५:००, १५:३०, १६:३०, १७:००, १७:३०, १८:००, १८:३०, १९:००, १९:३०, २०:००, २०:३०, २१:४५(पंचवटी कनेक्टेड).
पाथर्डी गाव ते नाशिकरोड – ६:०० (पंचवटी कनेक्टेड) , ७:३०, ८:००, ८:३०, ९:००, ९:३०, १०:००, १०:३०, ११:००, ११:३०, १२:००, १२:३०, १३:००, १३:३०, १४:००, १५:००, १६:००, १६:३०, १७:३०, १८:००, १८:३०, १९:००, १९:३०, २०:००, २०:३०, २१:००, २१:३०.
२) मार्ग क्रमांक २०६ – नाशिकरोड ते अमृतानगर मार्गे द्वारका, महामार्ग, पाथर्डीफाटा.
वेळा – नाशिकरोड ते अमृतानगर – ६:३०, ७:००, ७:३०, ८:००, ८:३०, ९:००, ९:३०, १०:००, १०:३०, ११:००, ११:३०, १२:००, १२:३०, १३:००, १३:३०, १४:३०, १५:००, १५:३०, १६:००, १६:३०, १७:००, १७:३०, १८:००, १८:३०, १९:००, १९:३०, २०:००, २०:३०, २१:००, २१:४५(पंचवटी कनेक्टेड).
वेळा – अमृतानगर ते नाशिकरोड – ६:००(पंचवटी कनेक्टेड), ७:४५, ८:१५, ८:४५, ९:१५, ९:४५, १०:१५, १०:४५, ११:१५, ११:४५, १२:१५, १२:४५, १३:१५, १३:४५, १४:१५, १४:४५, १५:४५, १६:१५, १६:४५, १७:१५, १७:४५, १८:१५, १८:४५, १९:१५, १९:४५, २०:१५, २०:४५, २१:१५, २१:४५, २२:१५.
तरी जास्तीत जास्त प्रवाश्यांनी या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास ८५३००५७२२२/८५३००६७२२२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.