इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय आस्थापनांना देखील सार्वजनिक सुट्टी असणार आहे. त्यामुळे अत्यल्प प्रवाश्यांची संख्या लक्षात घेता बुधवार दिनांक १९ फ़ेब्रुवारी रोजी सिटीलिंक बसेस कमी क्षमतेने धावणार आहे.
त्याचप्रमाणे शिवजयंती निमित्त नाशिक शहरातील विविध मार्गांवर साकारण्यात आलेले भव्य देखावे तसेच मिरवणुका लक्षात घेता अनेक मार्ग पोलिस प्रशासनाच्या वतीने वाहतुकीकरिता बंद करण्यात आलेले आहे. अश्या मार्गांवरील बसेस अन्य मार्गाने वळविण्यात येतील. त्याचप्रमाणे पोलिस प्रशासनाने ऐनवेळी दिलेल्या सूचनानुसार देखील मार्गात बदल होऊ शकतात. त्याचप्रमाणे नवीन सीबीएस येथून सुटणाऱ्या सर्व बसेस या निमाणी बसस्थानकातून सुटतील. याची प्रवाश्यांनी नोंद घ्यावी. तसेच प्रवास करण्यापूर्वीच प्रवाश्यांनी संपूर्ण बसफेरीची माहिती घेऊनच प्रवास करावा.
त्याचप्रमाणे बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सिटीलिंकचे सर्व पास केंद्र देखील बंद असणार आहे. याची सर्व प्रवाश्यांनी नोंद घ्यावी.
प्रवास करतेवेळी प्रवाश्यांनी कोणतीही समस्या असल्यास कृपया ८५३००५७२२२ / ८५३००६७२२२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.