शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सिगारेटच्या तुकड्यांनी बदलवले त्याचे नशीब; असं काय घडलं ?

by Gautam Sancheti
सप्टेंबर 18, 2021 | 12:52 pm
in संमिश्र वार्ता
0
twinkle kumar

मोहाली – सिगारेट ओढणे किंवा धुम्रपान करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. ही गोष्ट ठाऊक असूनही अनेक जण सिगारेटचे व्यसन सोडत नाहीत. पर्यावरणालाही सिगारेटचे थोटके धोकादायक आहे. अनेक प्राणी-पक्षी ते खातात, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अनेकांना हे कळतं पण वळत नाही. ही बाब एका तरुणाला चांगली कळाली. आपली शक्कल लढवून एक तरुण चक्क कोट्यधीश झाला आहे.

पंजाबच्या मोहाली येथील तरुणाचे नाव ट्विंकल कुमार आहे. सिगारेटच्या फेकलेल्या तुकड्यांचा अर्थातच थोटक्यांचा पुनर्वापर करून ट्विंकलने अनेक वस्तू बनिवल्या आहेत या कामामुळे त्याचे देशभरात कौतुक होत आहे. यूट्यूबवर हे तंत्रज्ञान शिकून त्याने हे काम सुरू केले. त्याच्यासोबत आज २२ लोकांचे पथक काम करत आहे. त्यातून तो चांगले अर्थार्जन करत आहे. ट्विकंल हा व्यवसायाने व्हिडिओग्राफर आहे. चित्रपट, लघुचित्रपट बनविण्याची त्याची लहान कंपनी आहे. त्यामध्ये तो सिनेमाचे चित्रिकरण करण्याचे काम करतो. मार्चमध्ये लॉकडाउन लागल्यानंतर त्याचा व्यवसाय बंद पडला. कमविण्याचे कोणतेच साधन नसताना एके दिवशी त्याने यूट्यूबवर सिगारेटच्या तुकड्यांचा वापर पुनर्निमितीसाठी करण्याचा व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमधून त्याने प्रेरणा घेतली आणि आपल्या मित्रांनासुद्धा ही गोष्ट सांगितली. मित्रांनी त्याचे म्हणणे गांभीर्याने न घेता ती गोष्ट हसण्यावारी नेली. त्यानंतर त्याने आपले वडील आणि भाऊजींकडून मदत मागितली. त्यांच्या सहकार्याने ट्विंकलने काम सुरू केले. आधी त्याने त्यासंदर्भातील संपूर्ण माहिती घेतली. सिगारेट, तंबाखूच्या दुकानांवर आपले बॉक्स लावले. त्यामध्ये लोक सिगारेट ओढून राहिलेले थोटके त्या बॉक्समध्ये टाकू लागले. कामात आधी खूपच अडचणी आल्या. लोकांनी उपहासात्मक वक्तव्यही केले. परंतु तो डगमगला नाही. त्याच्या कामाने चांगलीच ग्रीप घेतली होती.

व्यवसायात संपूर्ण पैसा ओतला
ट्विंकल डेराबस्सीमध्ये आपल्या गोदामात बॉक्स बनविण्याचे आणि सिगारेटचे पुननिर्मितीचे काम करत आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याने आयुष्याचा संपूर्ण पैसा गुंतवला. एका मित्राला भागिदार बनविले. उत्तर भारतात एकच व्यक्ती हे काम करत असून, त्याचा नोएडामध्ये लहान कारखाना आहे. त्याने त्यांची भेट घेतली. सिगारेटच्या थोटक्यातून कागद वेगळे करून त्यातून प्लॅस्टिकसारखा कापूस कसा काढावा ही गोष्ट त्याने जाणून घेतली.
महिलांनाही रोजगार
त्याने पंचकुला येथून व्यवसायाला सुरुवात केली आणि हळूहळू चंडीगड आणि मोहालीच्या लहान मोठ्या सिगारेट विक्री करणार्या दुकानांमध्ये बॉक्स लावले. लोक सिगारेट ओढून त्याची थोटके बॉक्समध्ये टाकतात. बॉक्समधून सिगारेट बड एकत्रित करण्यासाठी दोन मुलांना कामावर ठेवले. सिगारेटच्या बड्स स्वच्छ करण्याचे काम महिलांना देण्यात आले. या महिला महिन्याला तीन ते चार हजार रुपये कमावत आहेत.

सिगारेटमधून व्यवसाय कसा
ट्विकल म्हणाला, की सिगारेटच्या मागच्या भागात प्लॅस्टिकचा कापूस असतो. त्याला चार भागात वेगळे केले जाते. सिगारेट बडच्या मागील भागातील रसायनाला स्वच्छ करण्यास १५ दिवसांचा वेळ लागतो. त्यानंतर त्यांना नोएडा येथे पाठविले जाते. फिल्टर झाल्यानंतर त्यामध्ये ९८ टक्के रसायने काढून घेतली जातात. स्वच्छ झालेला कापूस तक्के, टेडी बेअर, सोफ्याच्या गाद्या आदीमध्ये वापरला जातो.
टाकाऊतून टिकाऊ
एक अर्धवट जळालेल्या सिगारेटमधून कागद, राख आणि तंबाखू आमच्याकडे शिल्लक राहतात. जळालेल्या सिगारेटच्या कागदाचा वापर डास निर्मुलनासाठी जाळण्यात येणा-या कागदात केला जातो. तर उर्वरित राख आणि तंबाखू खत तयार करण्यासाठी वापरले जाते. सध्या ट्रायसिटीमध्ये ८०० बॉक्स लावण्यात आले आहेत. हे काम सुरू करून आता दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा आहे नाशिक जिल्हयातील धरणाचा पाणीसाठा

Next Post

नाशिक – आडगावला बेकायदा दारू विक्री; दारु विकणारा गजाआड

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
daru

नाशिक - आडगावला बेकायदा दारू विक्री; दारु विकणारा गजाआड

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011