नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडकोची घरे आणि प्लॉट्स लीज होल्ड (९९ वर्षे करार) मालमत्ता असल्याने घरधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. बांधकामासाठी बँका कर्ज देत नाही आणि परवानग्यांसाठी सिडको आणि महापालिकेच्या दारी चकरा माराव्या लागत होत्या. घरावरही कर्ज मिळत नव्हते. त्यामुळे, सिडकोवासियांची घरे स्वतःच्या मालकीची व्हावी अशी मागणी पुढे येऊ लागली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नाशिकमध्ये फ्री होल्डची घोषणा केली होती. आता सिडकोचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे सिडकोने फ्री होल्ड करण्याबाबत प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी दिली आहे.
तिदमे म्हणाले की, मी स्वतः सिडकोच्या घरात लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे, सिडकोच्या प्रश्नांची जाण मला होतीच. त्यामुळेच, सिडकोची घरे “फ्री होल्ड” व्हावी यासाठी मी शिवसेनेच्या माध्यमातून अनेकदा पाठपुरावा केला. माझी शिवसेना महानगरप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पहिली मागणी केली ती सिडकोची घरे फ्री होल्ड करण्याची. त्याच वेळी, मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासित केले होते. सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित (दादा) पवार साहेब, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाठ, पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि महायुतीतील सर्व घटक पक्षांचे मनःपूर्वक आभार असे तिदमे यांनी म्हटले आहे.
२५००० घरमालकांना फायदा
सिडकोच्या २५००० घरमालक, तसेच सिडकोच्या प्लॉटवर बांधकाम केलेल्या इमारती, गृहनिर्माण संस्थांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सिडकोची घरे, भूखंड फ्री होल्ड व्हावी, घरधारकांना स्वतःचा मालकी हक्क मिळावा, यासाठी राजकीय पक्ष, पत्रकार, विविध संघटनांनी मागणी केली. माझे वडील सावळीराम तिदमे आणि बंधू योगेश तिदमे यांनीही पत्रकारितेच्या माध्यमातून सिडकोवासीयांच्या समस्यांना कायम वाचा फोडली. मी स्वतः सिडकोच्या घरात लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे, सिडकोच्या प्रश्नांची जाण मला होतीच. त्यामुळेच, सिडकोची घरे “फ्री होल्ड” व्हावी यासाठी मी शिवसेनेच्या माध्यमातून अनेकदा पाठपुरावा केला. मी शिवसेनेचा नाशिक पश्चिम विधानसभा प्रमुख असतांना फ्री होल्डसाठी आम्ही शिवसेनेचा भव्य मोर्चा सिडको कार्यालयावर काढला होता असेही तिदमे यांनी सांगितले.