नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कवी जगदीश देवरे यांच्या “चुलीतले निखारे” या कवितासंग्रहाचा संगीतमय प्रकाशन रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळयात संगीतकार संजय गीते यांनी कवी देवरे यांच्या या पुस्तकातील निवडक रचनांवर आधारीत गीत सादर केल्यामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. अशा पध्दतीने हटके संगीतमय प्रकाशन सोहळा केल्यामुळे प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली. या पुस्तकाचे प्रकाशन इंडिया दर्पण मीडिया हाऊस प्रकाशनाने केले आहे.
रविवारी सावानाच्या कै.मु.शं.औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश-१ विकास एस. कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर.एस.करंकाळ, अशोका एज्युकेशनचे संचालक डॉ.डी.एम.गुजराथी, मनमाड येथील ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष डॉ.प्रताप गुजराथी, कवी देविदास चौधरी, सौ.वैशाली देवरे, इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती, कार्यकारी संपादक भावेश ब्राह्मणकर आदी मान्यवर उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवी रविंद्र मालुंजकर यांनी केले. मनाली जगदीश देवरे हिने आभार मानले.
प्रा.डॉ.दिलीप धोंडगे यांचे भाषणही ठरले मार्गदर्शक
सामाजिक जाणिवा व्यक्त केल्या तर कविता होते असे नाही तर कवितेचे जे कवितापण असते, किंवा कवितेचे जे असतेपण असते त्याचा स्वाध्याय किंवा कवीपंरपरा जाणून घेणे देखील तितकेच आवश्यक आहे असे ज्येष्ठ समीक्षक प्रा.डॉ.दिलीप धोंडगे यांनी या प्रकाशन सोहळ्यात सांगितले. यावेळी त्यांनी मराठी साहित्यात प्रभावशील लेखकांची एक मोठी नामावली आपल्याला सांगता येईल. परंतु ते प्रभाव पचवून आपल्या स्वतःचा आत्मशोध घ्यायचा आणि त्याचबरोबर समाजाचा शोध घ्यायचा, हा आत्मशोध आणि जीवनशोध या दोन प्रक्रिया ज्याला करता येतात तो कविता लिहू शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
संपूर्ण प्रकाशन सोहळा बघण्यासाठी खाली दिलेल्या दोन लिंक वर क्लिक करा
भाग १
https://fb.watch/gEqCvOA5pP/
भाग २
https://fb.watch/gEr-zNmsKh/