इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन सुप्त संघर्षही सुरु आहे. त्यात काही जण जाहीर वक्तव्य करतात तर काही जण खासगीत चर्चा करतात. महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण असेल हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे तिन्ही पक्षाचे नेते या पदावर दावा करत असतात. आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही आपली इच्छा व्यक्त करुन गणरायाकडे मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना मिळावे असे साकडे घातले आहे.
भाजपच्या चित्रा वाघ यांनी नेमकं काय म्हटले ते बघा, देवेंद्र फडणवीस हे एक व्हिजन असणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने विकासकामांमध्ये आणि प्रगतीमध्ये एक नंबर गाठला आहे. जात पात बाजूला ठेऊन काम करणारा आमचा नेता आहे. त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडणून येऊ द्या आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी बाप्पाने द्यावी अशी इच्छा आमची आहे.
चित्रा वाघ यांच्याअगोदर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी गणारायाला साकडे घातले आहे. त्यामुळे या पदावरुन सुरु असलेली रस्सीखेच आता समोर आली आहे.