मुंबई – भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी एक ट्विट सध्या चर्चेत आहे. दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी व शिवसेनेचे खा. संजय राऊत यांची भेट झाली. त्यानंतर राऊत यांनी भेटीचा सारांश माध्यमासमोर सांगितला. त्यावरुन हे ट्विट वाघ यांनी केले आहे. वाघ यांनी आपल्या ट्विट म्हटले आहे, सोनियासेना प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने त्यांचा केंद्रसरकार बद्दलचा द्वेष उफाळून येणारच होता म्हणूनच आपलं पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबलतेने बीफचेही समर्थन करावं लागतंय मागील २ वर्षात ठाकरे सरकारने ‘फटे लेकीन हटे नही’चे धोरण कसं राबवलं ते जनतेला माहीतीये असे ट्विट मध्ये म्हटले आहे.
https://twitter.com/ChitraKWagh/status/1422789803565719561?s=20