नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इंडिया दर्पण फेसबुक लाईव्हमध्ये राज्य सेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांच्याशी उत्तरा तिडके यांनी खास मुलाखत घेतली आहे. राज्य सेवा हक्क काय आहे. या कायद्याची २८ एप्रिल २०१५ पासून अंमलबजावणी सुरु झाली. त्याला आज १० वर्षे पूर्ण होत आहे. त्याबद्दलचा प्रवास व एकुण या कायद्याची माहिती याबद्दल कुलकर्णी मॅडमकडून आज या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत. तर बघा चित्रा कुलकर्णी यांची खास मुलाखत