चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात रात्रभर कोसळलेल्या पावासामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून शहराला पाण्याने वेढा घातला आहे. अनेक सोसायटी व घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक पाण्यात अडकले आहे. विशिष्ठी व शिव नदीने धोक्याची पाणी ओलांडल्याने या नदीचे पाणी शहरात शिरल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे अनेक वाहने ही पाण्याखाली गेली आहे. या महापूराच्या परिस्थितीनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी बचावकार्याची माहिती देतांना सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘एनडीआरएफ’च्या २ टीम रवाना झाल्या. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य वेगाने सुरु आहे. कोस्टल गार्डच्या मदतीने बोटी तसेच फूड पॅकेट्स व इतर वैद्यकीय सहकार्य उपलब्ध करण्यात येत आहेत. या मदत कार्याच्या माहितीचे ट्विटही त्यांनी केले आहे…
रत्नागिरी जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘एनडीआरएफ’च्या २ टीम रवाना झाल्या. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य वेगाने सुरु आहे. कोस्टल गार्डच्या मदतीने बोटी तसेच फूड पॅकेट्स व इतर वैद्यकीय सहकार्य उपलब्ध करण्यात येत आहे- आपत्ती व्यवस्थापन मंत्री @VijayWadettiwar pic.twitter.com/HdhW0DQsFH
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 22, 2021