मुंबई – कोकणातील चिपी विमानतळावरुन शिवसेना विरुद्ध भाजप आणि राणे विरुद्ध ठाकरे असा मोठा संघर्ष सुरू असतानाच आता मनसेनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. राज्यातील रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय असल्यानेच मनसेने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंढरपूरला ८ तास स्वतः कार चालवत गेले होते. त्यावेळी त्याचे खुप कौतुक झाले होते. आता त्यांनी चिपी विमानतळाच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबई-गोवा महामार्गाने जावे, एवढी माफक अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे. त्यासाठी मनसेने सोशल मिडियात पोस्ट व्हायरल केल्या आहेत. त्यामुळे ही बाब सध्या चर्चेची बनली आहे.