सिंधुदुर्ग – कोकणातील चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा आज होत असताना प्रत्यक्ष व्यासपीठापूर्वीच येथे जबरदस्त पोस्टर वॉर रंगले आहे. शिवसेना विरुद्ध भाजप किंवा राणे विरुद्ध ठाकरे असा जबरदस्त संघर्ष पहायला मिळत आहे. पोस्टरवरचा मजकूर एकच असून केवळ नेत्यांचे फोटो आणि नावे बदलली आहेत. त्यामुळे या सर्वच प्रसिद्धीचे चांगलेच हसू होत आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांचे समर्थक आणि मंत्री नारायण राणे यांचे समर्थक यांच्यातील हे वॉर चांगलेच गाजत आहे. विमानतळ परिसरासह सिंधुदुर्गमध्ये ठिकठिकाणी लागलेले आणि सोशल मिडियात झळकणारे पोस्टर्स असे