नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्मार्टफोन निर्मितीमध्ये चीनी कंपन्या आघाडीवर आहेत. भारतात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनमध्ये चिनी बनावटीचेच सर्वाधिक आहेत. त्यामुळेच खरेदी-विक्री होणाऱ्या पहिल्या चार कंपन्यांमध्ये चीनी कंपन्यांचा समावेश होतो. असे असताना Honor ही चिनी कंपनी भारतीय बाजारातून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. अखेर या बातमीला कंपनीचे सीईओ झाओ मिंग यांनी दुजोरा दिला असून Honor ने भारतातून काढता पाय घेतला आहे.
झाओ मिंग यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंपनीने अधिकृतपणे भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले, “भारतात अनेक वर्षे काम केल्यानंतर, Honor टीमने भारतीय बाजारात व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.” Honor India च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मार्च 2021 मध्ये होळीच्या सणावर शेवटचे ट्वीट करण्यात आले होते. त्यानंतर एकही ट्वीट करण्यात आलेले नाही. मिंगने कथितरित्या ग्राहकांना आश्वासन दिले आहे की, बाजारात घसरण होत असतानाही Honor ने आपल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे ध्येय ठेवले आहे. कंपनीने गेल्या काही महिन्यांत देशात स्मार्टफोनसह स्मार्टवॉच, नोटबुक आणि बरेच काही लॉन्च केले आहे.
Honor ने आपले शेवटचे उत्पादन जून 2022 मध्ये भारतात लॉन्च केले होते. यामध्ये कंपनीने Honor Watch GS 3 लॉन्च केली. या स्मार्टवॉचमध्ये 1.43 इंचाची AMOLED स्क्रीन आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही एका चार्जवर 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते. त्याच्या मिडनाईट ब्लॅक मॉडेलची किंमत 12,990 रुपये आहे. तर ब्लू आणि क्लासिक गोल्ड शेड्स मॉडेलची किंमत 14,990 रुपये आहे.
Huawei च्या सब-ब्रँड Honor ने Honor X8 5G ला जागतिक स्तरावर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 480+ प्रोसेसर दिला जाईल. यात 6 GB RAM आणि 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले असेल. या फोनमध्ये 48 एमपी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. याशिवाय 8 MP सेल्फी कॅमेरादेखील उपलब्ध असेल. आता कंपनीने आपला व्यवसाय भारतात बंद केला आहे. त्यामुळे हा फोन भारतात लॉन्च होणार नाही.
Chinese Smartphone Company Close its Business from India Honor