इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – स्वतःचे स्पेस स्टेशन बनवणाऱ्या चीनला आणखी एक मोठा झटका बसला आहे. चिनी अंतराळ एजन्सीने पाठवलेले २३ टन वजनाचे रॉकेट प्रक्षेपणानंतर निकामी झाले असून ते पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत पडले आहे. हे रॉकेट मेंगटियन मॉड्यूल घेऊन अंतराळ स्थानकाकडे झेपावले. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, चिनी वैज्ञानिक रॉकेटला कक्षामध्ये स्थापित करू शकले नाहीत, त्यानंतर हे जड रॉकेट पृथ्वीच्या दिशेने पडत आहे. गेल्या आठवड्यात हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चायना मॅनेड स्पेस एजन्सी (CSMA) ने मेंगटियन मॉड्यूलसह लाँग मार्ट 5B रॉकेट तियांगॉंग स्पेस स्टेशनवर प्रक्षेपित केले. हे रॉकेट वातावरणात कोसळून जळण्याची शक्यता आहे, परंतु काही तुकडे जमिनीवर पडू शकतात. Space.com ने एरोस्पेस कॉर्पोरेशनच्या कॉर्पोरेट मुख्य अभियंता कार्यालयाचे सल्लागार टेड मुएलहॉप्ट यांचा हवाला देत म्हटले आहे की, चीनचा अवकाशातील ढिगारा संपूर्ण जगासाठी धोका आहे. जगातील सुमारे 88 टक्के लोकसंख्येला धोका आहे.
या वर्षाच्या सुरुवातीलाही चीनचे रॉकेट अनियंत्रित होऊन पृथ्वीच्या वातावरणात घुसले होते. अंतराळ स्थानकावर पाठवलेले हे दुसरे रॉकेट होते. प्रक्षेपणानंतर अवघ्या सहा दिवसांनी त्याचे नियंत्रण सुटले. रॉकेटवरील नियंत्रण गमावल्यानंतर चीनने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. रॉकेटचा काही भाग हिंदी महासागरात पडला ही दिलासादायक बाब होती.
येथे पडले रॉकेटचे भाग
रॉकेटचा बराचसा भाग जळाला. त्याच्या बूस्टर आणि लाँचरचे काही भाग मलेशिया आणि इंडोनेशियासह आग्नेय आशियातील काही भागांवर पडलेले आढळले. मात्र, या रॉकेटमुळे पृथ्वीवरील कोणत्याही जीवाला किंवा मालमत्तेला धोका नव्हता. अयशस्वी रॉकेटची माहिती देत नसल्याचा आरोप चीनवर यापूर्वीच करण्यात आला आहे.
Chinese Rocket 23 Tons Falling Back on Earth