बिजींग – चीनमधील लाँगजिंग सिटीमधील पियान माउंटनवर बांधलेल्या काचेचा पुल जोरदार वाऱ्यामुळे तुटला आहे. कित्येक ठिकाणी फुटलेल्या काचा पडल्या असून ३३० फूटावर एक तरुणही अडकला. या अपघाताची छायाचित्रे चिनी सोशल मीडियावर व्हायरल होत असून तेव्हापासून चीनमधील या काचेच्या पुलाच्या बांधकामावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या अपघातानंतर काही काळ पूल आणि परिसर बंद ठेवण्यात आला आहे. काचेच्या पुलामुळे येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. चीनच्या हुनान प्रांतात स्थित हा पूल लांबी ४३० मीटर आहे आणि सहा मीटर रुंद आहे. तर सोशल मीडियावर या छायाचित्रांमधे, एक तरुण या काचेच्या पुलावर ३३० फूट उंचीवर अडकल्याचे दिसत आहे आणि तो कसा तरी आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. जोरदार वाऱ्यात हा तरुण तुटलेल्या पुलाचे रेलिंग पकडून आहे.
अग्निशमन दलाचे जवान, पोलिस आणि पर्यटन कामगारांच्या मदतीने त्या ठिकाणी लटकलेल्या तरुणाने आपला जीव वाचविला. पुलावरुन खाली आणूण तरुणाला प्रथम जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पुलाच्या काचाही तुटल्या असून असा फोटो पहिल्यांदा चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेइबो वर शेअर केला गेला. त्याला सुमारे ४ दशलक्ष लाईक्स प्राप्त झाली आहेत. तर ट्विटरवर हा शेअर केलेला फोटो बघून एका ट्विटर युजरने लिहिले की, ही अत्यंत भयावह घटना आहे.