चिंचवड – प्रसिध्द सीए प्रमोद नहार यांच्या आई सुगनाबाई बुधमलजी नहार यांना स्वानंद महिला संस्था व श्री ऑल इंडिया कॅान्फरन्सतर्फे आज त्यांच्या सामाजिक व धार्मिक कामाबद्दल माता त्रिशला, माई रमा पुरस्कार पदश्री गिरीष प्रभूणे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा प्रा. सुरेखा प्रकाश कटारीया, अध्यक्ष सौ. सुनीता बोरा या उपस्थितीत होत्या. दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना या संस्थेतर्फे पुरस्कार देण्यात येतो. सुगनाबाई नहार या कामशेत येथील निवासी असून त्यांच्या कार्याचा गौरव या पुरस्कारांच्या निमित्ताने करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम ब्रम्हचैतन्य हॅाल येथे संपन्न झाला. या सोहळ्याला नहार परिवारातर्फे सौ. हेमलता प्रमोद नहार, मनोज बुधमलजी नहार, सौ. प्रिया मनोज नहार, सुप्रिया कटारीया यासह नहार परिवारांचे सदस्य उपस्थितीत होते.