इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाकिस्तानमध्ये चीनचे राजदूत जियांग झैडोंग यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यचा दावा पाकिस्तानच्या माध्यमांनी केला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावावर या दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी भारताच्या हल्ल्याचा पाकिस्तान सामना करु शकणार नाही, त्यामुळे पाकिस्तानला समर्थन द्यावं अशी मागणी झरदारी यांनी केली. त्यानंतर चीनने ते मान्य केल्याचा दावा पाकिस्तानच्या माध्यमांनी केला आहे.
दक्षिण आशियातील शांतता आणि स्थैर्य कायम राहण्यासाठी चीन नेहमीच इस्लामाबादच्या पाठीमागे राहील अशा विश्वास चीनने पाकिस्तानला दिल्याची माहिती आहे.