इंडिया दर्पण विशेष लेख
चीनचा डिंग लिरेन बनला बुद्धिबळ जगज्जेता
संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या स्पर्धेचा निकाल लागला आहे. चीनच्या डिंग लिरेन याने विश्वविजेतेपदाची लढत जिंकली आहे. त्यामुळे तो जगज्जेता बनला आहे. लिरेन याने रशियाच्या आयन नेपोम्नियाची याचा पराभव केला आहे.

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
माजी बुद्धिबळ जगज्जेता आणि अनभिषिक्त सम्राट मॅग्नस कार्लसन याने त्याच त्याच प्रतिस्पर्धी खेळाडूना हरविण्यात आता रस वाटत नाही. इजिप्तचा फ्रेच खेळाडू फिरौझा सारख्या तरुण खेळाडू जर आव्हानवीर असेल तरच आपण पुन्हा जग्ज्जेतेपदाची लढत खेळू असे जाहीर केल्याने अस्ताना (कझाकस्तान) येथे ९ एप्रिल पासून १४ डावांची विश्वविजेतेपदाची लढत फिडे जागतिक रॅंकिग प्रमाणे क्रमांक २ वरील तसेच कॅंडिडेट स्पर्धा विजेता रशियाचा आयन नेपोम्नियाची विरूध्द क्रमांक ३ चीन चा डिंग लिरेन यात अत्यंत चुरशीची झाली.
नियोजित १४ डाव ७-७ असे बरोबरीने सुटल्यानंतर २५ मिनिटांचे ४ जलद डाव टाय ब्रेकर म्हणून खेळविण्यात आले. त्यातील ३ डाव बरोबरीत सुटल्यानंतर चवथ्या शेवटच्या अत्यंत अटीतटीच्या डावात ४७ व्या चाली नंतर लिरेन ने बाजी मारली आणि तो एकूण १७ वा आणि चीन चा पहिला विश्वविजेता झाला . आता बुद्धिबळातील पुरुष आणि महिला दोन्ही विश्वविजेते चीन चे आहेत.
विजेतेपद मिळाल्यावर लिरेन म्हणाला “मी आता घरी गेल्यावर (आनंदाने) खूप रडणार आहे इतका मी emotional झालो आहे , माझा आनंद गगनात मावत नाही. त्यानंतर माझ्या आवडत्या Juventas या फुटबॉल टिमचे सामने पाहाणार आहे”, तर दोन वर्षांपूर्वी कार्लसन कडून हीच लढत पराभूत झालेला नेपो किंचित हसून पण खेदाने म्हणाला, “आता पुन्हा आव्हानवीरा साठी असलेली कॅंडिडेट स्पर्धा खेळणे, जिंकणे आणि पुन्हा लिरेन शी दोन वर्षांनी होणाऱ्या जग्ज्जेतेपद स्पर्धेत दोन हात करणे”, लिरेन जरी विजेता झाला असला तरीही विश्वनाथ आनंद पासून तर करुअना, अनिश गिरी आणि स्वतः कार्लसन यांच्या मते ही लढत इतकी तुल्यबळ होती की विजेतेपदाचे दावेदार दोघेही होते आणि आहेत.
लिरेन च्या विजयाचा अर्थ
लिरेन जिंकल्याने रशियाची बुद्धिबळ खेळातील मक्तेदारीला पुन्हा एकदा शह बसला आहे. विश्वनाथ आनंद (२००८ ते २०१३) आणि मॅग्नस कार्लसन ( २०१३ ते २०२३) या दोघांच्या नंतर आता लिरेन २०२४-५ पर्यंत विजेता राहणार असल्याने रशियाची बुद्धिबळा वरील जागतिक पकड सुटली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे . १९७२-७५ या काळात अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला हरवून रशियाच्या वर्चस्वाला प्रथम धक्का दिला होता. नेपो जरी आता दोन वर्षांनंतरच्या लढाईची तयारी करीत असला तरी अतिशय बुद्धिमान नवीन पिढी (भारताचे प्रद्न्यानंदन, गुकेश, अर्जुन एरिगियासी, रौनक सधवानी इ आणि इजिप्तचा अबुल सत्तारोव इ) त्यावेळी ३४ वर्षांचा होणाऱ्या नेपोची डाळ शिजू देतील काय?
https://twitter.com/Somali_ICS/status/1652693466239967232?s=20
दीपक ओढेकर
[email protected]
China’s Ding Liren Won World Chess Championship beat Russia’s Ian Nepomniachtchi