विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
चीन हा देश केवळ भारतासाठीच नव्हे तर जगातील अनेक देशांसाठी डोकेदुखी आणि त्रासदायक ठरणार आहे. आधीच कोरोनाचे विषाणू सोडून जगभरात हाहाकार माजविला असताना चीनने आता अनेक देशात कुरापती सुरु केल्या आहेत. भारताबरोबर तर त्याचे खूप वर्षापासून शत्रुत्व आहे मात्र आता याचा त्रास अन्य देशांनाही भोगावा लागत आहे. चीन आता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये भांडण लावण्याचे काम करत आहे.
चीन आपल्या गटातील देशांची संख्या वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करत असून त्याअंतर्गत तो आता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबत खुद्द ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले की, चीनमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याच्या मुद्दय़ावर दोन्ही देश म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे एकत्रित आहोत. दोन्ही देशांमधील वार्षिक चर्चेचा हा सर्वात मोठा मुद्दा ठरला आहे.
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा या ऑस्ट्रेलिया येथे आल्या तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, चीन विरुद्धच्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या कारवाईत आमचा देश न्यूझीलंड हा ऑस्ट्रेलियाला पाठिंबा देईल. मात्र त्यानंतर पत्रकारांशी बोलताना न्यूझीलंडचे पंतप्रधान यांची चीनच्या मुद्द्यावर उभय देशांमधील चर्चेतील न्यूझीलंडची भूमिका प्रतिबिंबित झाली नाही.
वास्तविक चीनवर मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचे अनेक आरोप आहेत. तरीही या मुद्यावर न्यूझीलंड सहकार्याचा वापर करण्यास नाखूष आहे. विशेष म्हणजे या सहकार्य गटात युनायटेड स्टेट्स, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या पाच इंग्रजी भाषिक देशांचा समावेश आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान पुढे म्हणाले की, चीन आमच्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे यात काही शंका नाही. विशेष म्हणजे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रप्रमुखांनी सुमारे १५ महिन्यांच्या अंतराने दोनदा भेट घेतली. तसेच चीन दोन्ही देशांसाठी एक मोठा व्यापारिक भागीदार असून चीनने आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर केला पाहिजे, असे दोघांचेही म्हणणे आहे.