इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मार्चमध्ये चीनमध्ये भीषण विमान अपघात झाला होता. या विमान अपघातात १३२ जणांचा आपला जीव गमवावा लागला. चायना इस्टर्न एअरलाइन्सचे बोईंग ७३७ विमान टेकडीवर आदळून कोसळ्याने हा अपघात सांगितले जात असले तरी या विमान अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आता विमान अपघातानंतर तब्बल दोन महिन्यांनी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या अपघातामागे तांत्रिक बिघाडाचा कोणताही पुरावा नसल्याचे तपासात समोर आले आहे. मग हे विमान जाणूनबुजून क्रॅश करण्यात आले का, याचा तपास अधिकारी करत आहेत.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॉकपिटमध्ये कोणीतरी जाणूनबुजून विमान क्रॅश केल्याचे अहवालात उघड झाले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक मूल्यांकनात हे आढळून आले आहे. ब्लॅक बॉक्समधून मिळालेल्या डेटाचे विश्लेषण केल्यानंतर अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. तथापि, बोईंग कंपनी, जेट बनवणारी कंपनी आणि यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) यांनी चिनी नियामकांना प्रश्न पाठवून अहवालावर भाष्य करण्यास नकार दिला.
२१ मार्च रोजी चायना इस्टर्न एअरलाइन्सचे बोईंग ७३७ विमान गुआंग्शीच्या टेकडीवर कोसळले होते. विमान कानमिंगहून ग्वांगझूला जात होते. विमानात ९ क्रू मेंबर्ससह एकूण १३२ लोकं होते. अपघातात सर्वांचा मृत्यू झाला होता. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
चीनच्या १२ वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विमान अपघात होता. २०१०मध्ये चीनमध्ये शेवटचे जेट विमान यिचुन विमानतळाजवळ कोसळले. कोसळले होते. या अपघातात ४४ जणांचा मृत्यू झाला होता.