नवी दिल्ली – जपानच्या हद्दीत असलेल्या सेनकाकू बेटावरून चीन मुद्दाम तणावपूर्ण वातावरण तयार करीत आहे. कारण आता चीनने बेटाचे लँडस्केप व भूसर्वेक्षण जारी केले आहे. या बेटाला चीनने आपला दिआओयू बेट म्हणून दाखविले आहे. लँडस्केप सर्वेक्षण जारी करीत ड्रॅगनने एकवेळा पुन्हा या बेटावर दावा केला आहे.
चीनच्या नैसर्गिक संसाधन विभागाने सेनकाकूसोबत दोन इतर बेटांचे सर्वेक्षणही जारी केले आहे. या बेटावर जपानचा ताबा असूनही चीन आणि तायवान हे दोन्ही देश आपला अधिकार सांगत आहेत. चीनच्या मंत्रालयाने अलीकडेच स्पष्ट केले आहे की सर्वेक्षणातील भौगोलिक स्थितीच्या आकड्यांमध्ये सुधारणा होईल. यामुळे दिआओयू बेटाचे व्यवस्थापन आणि जलवायू सुरक्षेला मदत होईल.
मंत्रालयाने हा अहवाल जारी करताना नकाशाही दिलेला आहे. त्यासोबत काही छायाचित्रे जारी केली आहेत ज्यात सर्वेक्षणाचा पोतही दिसत आहे. सेनकाकू बेटाच्या सीमेवर चीनने अनेकवेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकदा त्याला यशही मिळाले आहे. पण आता सर्वेक्षण आणि अहवाल जारी केल्यानंतर चीन आणि जपानमध्ये तणाव वाढलेला आहे.
हे सर्वेक्षण डेटासोबतच हायरिझोल्यूशन सॅटेलाईट रिमोट सेंसिंग सर्वेक्षणावर आधारित असल्याचा दावा चीनने केला आहे. अहवालाच बेटावरील काही छायाचित्रेही सामील आहेत. अलीकडेच वादग्रस्त पूर्व चीन सागरात चीनच्या हालचाली वाढल्यामुळे चीन आणि जपानमध्ये तणाव वाढलेला आहे.
गेल्या महिन्यात जपानने म्हटले आहे की चीनच्या सागरी सीमांवरील हालचाली वाढल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनची घुसखोरी रोखण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले होते.