इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चीनमध्ये कोरोनाचा अक्षरशः कहर सुरू आहे. कोरोनाची भयावह आकडे पाहून जगभरात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. चीनमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लाखो लोकांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे चीनमध्ये ना रुग्णालयातील खाटा रिकाम्या आहेत, ना तिथे औषधे उपलब्ध आहेत. कोरोना बाधितांमध्ये वाढ झाल्याने चीन आपली आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने आता रविवारपासून असा डेटा जारी करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
https://twitter.com/Ak_bh2047/status/1605786855357575168?s=20&t=s_7MGR1xabcp6AwlFp_img
चीनच्या NHC (नॅशनल हेल्थ कमिशन) ने एका निवेदनात म्हटले आहे की, “चीनी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन संबंधित कोविड-19 माहिती आणि संशोधनासाठी कोरोना डेटा प्रकाशित करणार नाही.” चीनमध्ये कोरोनाने जीवघेणे रूप धारण केले आहे आणि कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १०० दशलक्ष ओलांडली आहे आणि सुमारे १० लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे. त्याचवेळी, परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, रुग्णालयात उपचाराअभावी ५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
https://twitter.com/DailyLoud/status/1606694734197653506?s=20&t=s_7MGR1xabcp6AwlFp_img
China Covid Out Break Figures Big Decision
Covid 19 Corona Virus Infection