इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चीनमध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. तब्बल १३३ प्रवाशांना घेऊन जाणारे बोईंग विमान जंगलात पर्वतावर कोसळले आहे. या दुर्घटनेत सर्वच्या सर्व प्रवासी आणि विमान चालकासह अन्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नक्की कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या मोठे दुर्घटनेबद्दल जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दक्षिण चीनमधील गुआंगशी या प्रांतात विमानाचा हा अपघात झाला आहे. आजवर जगात ज्या काही मोठ्या विमान दुर्घटना घडल्या आहेत. त्यातील ही एक असल्याचे सांगितले जात आहे. काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान कुनमिंग या शहरातून चांगशुई या शहराकडे जात होते. दुपारी सव्वा वाजेच्या दरम्यान या विमानाने उड्डाण घेतले. त्यानंतर हे विमान दुपारी ३ वाजता निश्चित विमानतळावर पोहचणार होते. मात्र, वाटेतच हा मोठा अपघात झाला आहे. घनदाट जंगलात हे विमान कोसळले आहे. दुर्घटना कशामुळे झाली याचा शोध सुरू आहे. तसेच, आपत्ती निवारण पथक, पोलिस आणि अन्य मदतकार्य करणारे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
या विमान दुर्घटनेचे बघा हे दोन व्हिडिओ
https://twitter.com/ShanghaiEye/status/1505823387016478721?s=20&t=yw01YMEmT5K9XSrcEPFotg