विशेष प्रतिनिधी, मुंबई
एकीकडे हिमालयाच्या बर्फाच्छादित प्रदेशात हाडे गोठून टाकणाऱ्या थंडीत भारत-चीन सीमेवर चीनच्या कुरापती सुरू असतानाच दुसरीकडे भारताच्या विविध प्रांतात सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात शिरकाव करून सिनेमा पासून ते विद्यापीठ पातळीवरील शिक्षण संस्थांपर्यंत चीनचा हस्तक्षेप वाढत असून वैचारिक अतिक्रमण करण्याचा प्रकार मानले जात आहे, सहाजिकच या संबंध संदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. चीन हा देश भारतात चित्रपट उद्योगातून सर्व क्षेत्रात चीनी गुंतवणूक वाढवत आहे. चित्रपट उद्योगात चिनी कंपन्या सहनिर्मिती म्हणून काम करत आहेत. तसेच बीजिंग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवच्या आयोजनामागे चिनी अजेंडा स्पष्ट दिसत आहे. सहाजिक तो बॉलिवूडमध्ये आपला हस्तक्षेप वाढवत आहे. चीन भारताला अनेक आघाड्यांवर शिरकाव करत आहे.
एका भारतीय विचारवंत गटाच्या अभ्यासात दावा केला आहे की चीन रणनीतीचा भाग म्हणून भारतातील अनेक क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप वाढवत आहे. विशेषत: चित्रपट, विद्यापीठे, सामाजिक संस्था, सोशल मीडिया, थिंक टँक आणि तंत्रज्ञान उद्योग या क्षेत्रात काही वर्षांत चीनचा हस्तक्षेप वाढला आहे. विशेषतः भारतीय विद्यापीठांमध्ये चिनी हस्तक्षेपही वाढत आहे. भारत-चीन संबंधांवरील विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावरही हे स्पष्ट दिसत आहेत. तसेच चिनी शिक्षण संस्थांचा हस्तक्षेप वाढत आहे. प्रचंड परकीय निधी मिळेल या अपेक्षेमुळे अनेक भारतीय संस्था चीन-अनुकूल दृष्टिकोन स्वीकारत आहेत. लॉ अँड सोसायटी अलायन्सने वर्षभरापासून केलेल्या सर्वेक्षण अहवालात ‘मॅपिंग चायनीज फूटप्रिंट अँड इन्फ्लुएंस ऑपरेशन इन इंडिया’ मध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चीनने सामरिक क्षेत्रात आपली गुंतवणूक वाढवली आहे, त्यामागे बीजिंगचा छुपा अजेंडा आहे, त्याला सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या मताला विशिष्ट आकार द्यायचा आहे. इतकेच नव्हे तर या अहवालात म्हटले आहे की, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने एक लॉबी तथा गट स्थापन केला असून त्याचे नेतृत्व भारतीय डावे विचारांचे लोक करतात. आतात केवळ चित्रपट क्षेत्रासाठी काम करत आहे. या अहवालात असाही आरोप करण्यात आला आहे की, चित्रपट नियामक मंडळात अशा लोकांना सामील करण्यात आणि त्यांच्या हिताचे रक्षण प्रयत्न करण्यात येत आहेत. चीनकडून अनेक भारतीय थिंक टँकना देणगीच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जात आहे. सदर विचारवंतांमध्ये आपले स्थान आणि डावे विचार निर्माण करत आहे.